सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या स्वरा चव्हाणचे मैदानी स्पर्धेत यश

दापोली, दि. ५ : दापोली येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. स्वरा चव्हाण हिने उल्लेखनीय कामगिरी केली.

१७ वर्षांखालील गोळाफेक क्रीडा प्रकारात स्वराने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या यशामुळे तिची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच थाळीफेकमध्येही तिने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक मिळवले.

स्वराच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुजय मेहता, मुख्याध्यापिका रितू मेहता आणि क्रीडा मार्गदर्शक सुहास नलावडे यांनी तिचे अभिनंदन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवता आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आणखी वाचा