आगरवायंगणी, दि. ५ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत आगरवायंगणी येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात शिवम प्रशांत आलदार, तर मुलींच्या गटात मृणाल प्रशांत आलदार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोघांची विभागीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संजय बनसोडे, उपमुख्याध्यापक तथा पर्यवेक्षक भगवान खाडे, संदीप मुंढेकर, क्रीडा विभागप्रमुख समीर कालेकर तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाने अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.








