कुटगिरी पुनर्वसन येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

कुटगिरी बौद्धजन सेवा संघाच्या वतीने बुद्धपूजा व खीरदान

सावर्डे, दि. २० : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षण समितीच्या कुटरे विभागातील गट क्रमांक ३ अंतर्गत कुटगिरी बौद्धजन सेवा संघ, नांदगाव पुनर्वसन शाखेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन समाजमंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला.

संघटनेचे अध्यक्ष आयु. तुकाराम महादेव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ आणि लहान मुलांनी सहभाग घेतला. सकाळी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना प्रसाद म्हणून खीरदान करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेला २०२६ मध्ये ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या धम्मक्रांतीचे स्मरण यानिमित्ताने करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मविचारांचा प्रसार करणे, सामाजिक ऐक्य जपणे आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहणे, हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आला.

संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि महिला मंडळाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

आणखी वाचा