पाली / बेणसे दि.13 (धम्मशील सावंत) : शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागतर्फे युवा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
या दिनाचे औचित्य साधून कुमारी वेदश्री भावे व कुमार रोहित साळसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय युवा दिन अर्थात स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने प्रा. डॉ सुरेश पाथरकर, प्रा.डॉ.सौ अंजली पुराणिक, प्रा. ज्ञानेश्वर मुंढे, प्रा. संतोष भोईर, प्रा.सौ अस्मिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपचांग यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेतला.
यावेळी प्रा. विशाखा मानकामे, प्रा.अपर्णा केदारी, प्रा. सौ.सरिता देशमुख, प्रा. कळकुटे, प्रा. महेश राहीज, प्रा. सौ.जया मच्चीगर, प्रा.कृष्णा जांभेकर, प्रा. डॉ.सौ.भारती आरोटे, प्रा.सौ.दीपाली बांगारे, प्रा.सौ.भक्ती साजेकर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. अनिल झेंडे आणि आभारप्रदर्शन प्रा.सौ. स्नेहल बेलवलकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकानी विशेष मेहनत घेतली.








