परशुराम प्रबोधिनीच्या उन्हाळी संस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न

चिपळूण, दि. १२ (प्रतिनिधी): परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण, संचालित परशुराम प्रबोधिनी अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन चिपळूण शहरातील प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रुतिका सुनील कोतकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय व शिशुविहार तसेच सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम व शिशुविहार विभाग या चार विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
या कार्यक्रमाला परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह श्री.विजय चक्रदेव, कार्यकारी मंडळ सदस्य श्री.अभय चितळे ,श्री.सुनील जोशी, श्री.तुषार गोखले, परशुराम प्रबोधिनी प्रमुख श्रीम.कीर्ती भागवत तसेच चारही विभागाच्या मुख्याध्यापिका, विभाग प्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

हे संस्कार शिबिर बुधवार दि. १७/०४/२०२४ पर्यंत चालणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी शिशुविहार विभागाच्या शिक्षिकांनी उत्तम प्रकारे स्वागत गीत सादर केले. संस्कार शिबिराची सुरुवात सौ. ज्योती शिंदे व सौ. सुफला बेंदरकर यांनी प्रार्थना व श्लोक गायनाने केली.

प्रेमजीभाई आसर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगीता नाईक यांनी प्रास्ताविकातून संस्कार शिबिर आयोजनाचा उद्देश सांगून शिबिरातील नियोजित उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली.
कार्यक्रमाच्या उद्घाटक डॉ. श्रुतिका कोतकुंडे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शरीर सुदृढ राहण्यासाठी शारीरिक व्यायाम व मनाचे आरोग्य राखण्यासाठी मानसिक व्यायाम गरजेचे आहेत. मानसिक आरोग्यासाठी आनंद अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक गोष्टीतून आनंद मिळवता आला पाहिजे यासाठी चांगल्या सवयींची जोपासना केली पाहिजे अशी माहिती दिली तसेच कृतीयुक्त व्यायाम घेतला.

कार्यकारी मंडळ सदस्य श्री.चितळे तसेच संस्थेचे सहकार्यवाह श्री.चक्रदेव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांचा सन्मान संस्थेचे सहकार्यवाह श्री. चक्रदेव यांनी शाल व श्रीफळ देऊन केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गगनग्रास मॅडम यांनी केले.

आणखी वाचा