मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; भाजपाचा दारूण पराभव अटळ: नाना पटोले

मुंबईदि. १९ एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. Dतरुणशेतकरीमहिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले. मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने केलेला आहेत्यामुळे भाजपाचा दारुण पराभव होणार हे अटळ आहेअसे  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावलात्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले कीमोदी सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला आहेजनतेला खोटी आश्वासने देऊन फसवले. नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तरुणांना फसवलेशेतमालाला दीडपट भाव देणारउत्पन्न दुप्पट करणार असे सांगून शेतकऱ्यांना फसवलेकामगारांना देशोधडीला लावलेमहिलांना फसवलेत्यामुळे जनतेत मोदी सरकारविरोधात तीव्र संताप आहे. हा संताप प्रचारावेळी दिसून आला. देश विकून देश चालवला त्याला विकास म्हणणार कागब्बरसिंग टॅक्स आणून जनतेला लुटले व मुठभर धनदांडग्यांचे खिशे भरले याला विकास म्हणतात काअसे सवालही पटोले यांनी उपस्थित केले.

विदर्भाची जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलेली आहेयावेळीही जनतेचे मोठे समर्थन मिळाल्याचे दिसलेत्यामुळे नागपूररामटेकगडचिरोली -चिमूरचंद्रपूर आणि भंडारा-गोंदिया या पाचही मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने विजयी होतीलअसा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा