संगमेश्वर, दि. ०७ (प्रतिनिधी): येथील नवनिर्माण महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि लोवले ग्रामपंचायत यांच्या वतीने लोवले ग्रामपंचायतीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ग्रामस्थांना वृक्ष वाटपही करण्यात आले. या प्रसंगी सरपंच ऋतुजा कदम, प्राचार्य डॉ. संजना चव्हाण, ग्रामसेवक अभिनंदन पाताडे, राष्ट्रीय सेवा विभागाचे प्रमुख प्रा. अनिल नेमण, प्रा. तेजस्विनी सावंत, प्रा. प्रशांत जाधव यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि लिपिक उपस्थित होते.








