लांजा, दि. १३ (प्रतिनिधी) : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आसगे नं. १ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी भात लावणी या उपक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. १२ जुलै रोजी केले गेले होते.
आजकाल मोबाईल मध्ये अडकून पडलेल्या मुलांना थोडेसे निसर्गाकडे मिळण्याचा हा प्रयत्न खेडेगावातील बरेचश्या मुलांचे आई-वडील शेतकरीच असतात. आपल्या आई-बाबा शेतीत किती कष्ट करतात हा अनुभव आल्यानंतर त्या कष्टाची परतफेड करण्याची वृत्ती त्यांचे मनात आपसूकच निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडण्यासाठी तसेच पुस्तकी शिक्षणाबरोबरच आयुष्यात काही अनुभव प्रत्यक्ष घेऊन त्याचा उपयोग भावी जीवनात करता यावा असा उद्देश ठेवून शेती भात लावणी या उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात इयत्ता १ ली ते ७ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शेती करण्याचा आनंद लुटला.
भात लावणीचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुदीन चव्हाण सर..आणि त्या शाळेतील पदवीधर शिक्षिका अर्चना पेणकर, पदवीधर शिक्षक व्हनावडेकर सर ,उपशिक्षिका शमा शेख, व्यवस्थापन कमिटी व आसगे गावचे ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.








