एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या ‘एनएसएस’ने राबविला भात लावणी प्रकल्प

रत्नागिरी, दि. १३ : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातील विद्यार्थ्यांनी शहराजवळील फणसवळे येथे सामाजिक कार्यकर्ते आणि कुशल शेतकरी आत्माराम नारायण सनगरे यांच्या शेतात भात लावणी प्रकल्प राबविण्यात आला.

भारत हा कृषीप्रधान देश असलेने प्रत्येकाला पुस्तकी ज्ञानाबरोबरच शेतीचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. हल्ली शेती करायला पैरी (मजूर) मिळणे अवघड झाले आहे. तसेच येणाऱ्या मजुरांची मजुरीही दिवसागणिक वाढत आहे. याचा विचार करता ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करणे कठीण जात आहे. याच गोष्टींचा विचार करून ‘एनएसएस’अंतर्गत दरवर्षी भात लावणी प्रकल्प राबविला जातो. यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विद्यार्थ्यांना भात लावणीचे प्रात्यक्षिक दाखवले जाते.

यावर्षी हा उपक्रम रत्नागिरी शहराजवळील फणसवळे या गावातील कुशल शेतकरी आत्माराम सनगरे यांच्या शेतात राबविण्यात आला. यात कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी यांच्यासह २८ स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रा. साळवी यांनी शेती लावणी प्रकल्पाचा उद्देश काय आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आणि वैष्णवी, रत्ना S1, S2 या जातीचे भात पिकाची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना रोपं काढणे, बांध घालणे, पॉवर टिलर चालवणे, शेणखत घालणे, जमीन समतल करून रोपं लावणे या शेतीच्या कामांचा अनुभव घेतला.

या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, एनएसएसचे प्रमुख प्रा. साळवी आणि स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. यासाठी फणसवळे गावाच्या सरपंच संस्कृती पाचकुडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आणखी वाचा