मुंबई, दि. १८ (क्षितिज कदम): घाटकोपर पूर्वेतील पंतनगर हद्दीतून चोरीला व हरवलेले 151 मोबाईल फोन एकूण किंमत 15,10,000 रुपये पंतनगर पोलिसांनी हस्तगत केले असून मूळ मालकांना ते परत करण्यात आल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी दिली. परिमंडळ 7 चे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी हरवण्यात येणारे मोबाईल आणि चोरीला जाणारे मोबाईल बाबत शोध मोहीम राबवली होती.
सहायक आयुक्त दिपक निकम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भास्कर कोकरे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम ताकमोगे, पोलीस उपनिरीक्षक सागर खोंद्रे , पोलीस हवालदार संतोष गीध, महिला पोलिस शिपाई रूपाली हाडवळे या पथकाने मानवी कौशल्य आणि अधिक तपास करून एकूण 151 मोबाईल फोन ज्यांची एकूण किंमत 15,10,000 आहे. हस्तगत करण्यात आलेले 151 मोबाईल त्या मुळ मालकांना परत करण्यात आले.पोलिसांनी राबवलेल्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.








