खेड, दि. २१ (प्रतिनिधी): कोकण व मुंबईला जोडणारी लाईफ लाईन असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे खेळ भरणे येथील नवीन पुराला मोठा तडा गेल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्याची वेळ प्रशासनावरती आली आहे. ऐन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेबाबतच मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीवरील मोठ्या पुलाला मोठा तडा गेल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला आहे. खेड भरणे पूल धोकादायक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे गोवा येथून मुबई कडे जाणारा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. काम निकृष्ट दर्जाचे परशुराम घाट लँड्सलाइड झाली. चिपळूण बहादुरशेख नाक्यावरचा ब्रिज कोसळला, आज हा ब्रिज कोसळला त्यामुळे एकदंरीत या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार दुर्घटना घडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.








