रत्नागिरी, दि. २३ (प्रतिनिधी): वन संवर्धन दिनानिमित्त गुहागर येथे वृक्षदिंडी व वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्नसर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर जामसूत तालुका गुहागर या विद्यालयामध्ये एस आर दळवी (I) फाउंडेशन शाखा रत्नागिरी व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी व वृक्ष लागवड या स्वरूपात मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला .
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीचे संचलन केले. यामध्ये विद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्य पालक शालेय समितीचे सन्माननीय पदाधिकारी ग्रामस्थ सर्व शिक्षक शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. झाडे लावा झाडे जगवा या घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दुमदुमून टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका सौ डाकवे पी .पी .यांनी भूषविले प्रमुख उपस्थितीमध्ये तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी दादा साळवी पोलीस पाटील वैभव रेवाळे, ग्रामसेवक श्री गावणंग ,श्री संजय सावंत उपस्थित होते .उपस्थितांना वृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आले.








