देव-घैसास-कीर महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी, दि. २५ : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये इतिहास विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जुलै २०२४ रोजी लोकमान्य टिळक जयंती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत इतिहास विभाग प्रमुख सहा. प्रा. मंदार बेटकर यांनी केले.
 टिळकांच्या जीवनातील मंडालेच्या तुरुंगातील प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडला. भारत स्वतंत्र होण्यासाठी त्यांचा संघर्ष किती मोलाचा आहे हे समजावून सांगितले.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच जयंतीनिमित्त महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची बोंबले( प्रथम वर्ष वाणिज्य),द्वितीय क्रमांक आश्विनी करमरकर (प्रथम वर्ष वाणिज्य), तृतीय आमिषा मडके (द्वितीय वर्ष वाणिज्य) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. योगिनी बापट (तृतीय वर्षं कला) व  आभार प्रदर्शन दिव्या निळे हिनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद उपस्थित होता.

आणखी वाचा