मुंबई, दि. २६ : महानगपालिकेच्या दुर्लक्षामुळे विक्रोळी कन्नमवार नगर मधील रस्त्यांची चाळण झाली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार केली असतानाही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यामुळे नाराज काँग्रेस पक्षाने शुक्रवार ता ( 26) रोजी जनता मार्केट येथे “खड्डे बुजाव” आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्डे पडलेल्या रस्त्यांवर खड्डे खडी टाकून बुजवण्याचे काम सुरू केले.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे हे महानगपालिकेचे अपयश आहे. दरवर्षी त्याच जागेवरती खड्डे कसे पडतात. पालिका प्रशासन करतो तरी काय? आणि खड्डे पडल्यानंतर फक्त वरच्या वर खडी टाकून जातात. काही तासाच्या रूपांतर पुन्हा खड्ड्यात होतं. या खड्ड्यामुळे कोणाचा अपघात झाला? कोणाचा जीव गेला? तर कोण जबाबदार? असा सवाल काँग्रेस कडून करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनामुळे एकीकडे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तर दुसरीकडे, महानगपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काँग्रेसने या खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी काढत विकास बीएमसी असे लिहिले आहे. यावेळी काँग्रेसचे महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.








