रत्नागिरी, दि. ३१ : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून निसर्ग मंडळ विभागाचे उद्घाटन करण्यात आले. निसर्ग मंडळ व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून निसर्ग
मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्ग मंडळ विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड यांनी केले. प्रास्ताविकातून निसर्ग मंडळ विभागाचे वर्षभरातील उपक्रम यांची माहिती देण्यात आली. निसर्ग मंडळाअंतर्गत वर्षभर जे उपक्रम केले जातील, त्यातून निसर्ग संवर्धन करण्यासाठी सर्वांनी मिळून खारीचा वाटा उचलूया, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रज्वल कळंबटे याने केले. प्रदिप भिसे याने आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव व प्राध्यापक, उपस्थित होते.








