ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षा’ जनजागृतीची गरज- अॅड. रमेश कांबळे

रत्नागिरी, दि. ०२ (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा राजापूर यांच्यावतीने यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर सोमवार दिनांक 22 दिवस रोजी सकाळी ११-०० वाजता ना.ग. कुलकर्णी विद्यानिकेतन व एन जी के जनता कनिष्ठ महाविद्यालय सागवे येथील सौ विजया नारायण कुलकर्णी सभागृहात उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून आ.रा.स. स्पर्धा परीक्षा अकादमीचे संचालक अॅड राकेश सत्वे सर बोलत होते.
 “आजच्या युवा पिढीने पारंपरिक शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास वयाच्या 21व्या वर्षी प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी प्राप्त होऊ शकते. त्याकरिता त्यांनी स्वतःच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून घेऊन खऱ्या अर्थाने भविष्यातील स्पर्धेसाठी स्वतःला सक्षम, कार्यक्षम आणि सर्वात महत्त्वाचे एक उत्तम माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया अगदी लहान वयातच सुरु करायला हवी व त्याला नीतिमत्तेची जोड द्यायला हवी असे प्रतिपादन अॅड. राकेश सत्वे सर यांनी केले तसेच प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी तयारी विद्यार्थ्यांनी दहावीनंतरच  केल्यास त्यांना पदवीचे शिक्षण आणि कोणत्याही एका स्पर्धा परीक्षेची तयारीने विशेषता एम.पी.एस.सी.,यू.पी.एस.सी.आयोगाच्या परीक्षा देता येतील आणि विद्यार्थ्याला वेळेतच सुयश मिळवता येईल असे मत अॅड. सत्वे  सरांनी मांडले.
यावेळी विचार पिठावर सेवा निवृत्त नायब तहसीलदार व भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव अॅड. डॉ. रमेश कांबळे शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत देवरुखकर, मुख्याध्यापक भारत कांबळे सर, शिक्षक पालक संघाचे रवींद्र पातले, शाळा व्यवस्थापन समितीचे किशोर गुरव, सागवे गोठिवडरे ग्रामविकास मंडळ रजिस्टर मुंबईचे उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी, शिक्षक वर्ग रिद्धी गावकर,अनिकेत जाधव, मयुरी देवघर,अध्यापक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य  डॉ. एम.के. कांबळे सर, विद्यार्थी आणि पालक इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. रमेश कांबळे यांनी केले, संस्थेची ध्येय उद्दिष्टे विशद करताना म्हणाले या जिल्ह्यांमध्ये सनदी अधिकारी निर्माण व्हावेत, आय.ए.एस., आय.पी.एस., अधिकारी निर्माण व्हावेत तसेच स्टाफ सिलेक्शन कमिशन ही स्पर्धा परीक्षा देऊन या जिल्ह्यांमध्ये अधिकारी निर्माण व्हावे यासाठी एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी.,स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि इतर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्पर्धा परीक्षा देऊन ग्रामीण भागातला विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या विभागातीलअधिकारी बनावा, आयएएस अधिकारी किंवा आयपीएस अधिकारी बनावा यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम जिल्हाभर राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास गलंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन व समारोप अनिकेत जाधव सर यांनी केले.

आणखी वाचा