प्रेमजीभाई आसर प्राथ.विद्यालयात क्रांती दिन व नागपंचमी सण साजरा

चिपळूण, दि. १०- परशुराम एज्युकेशन सोसायटी,संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय,चिपळूण या शाळेत  क्रांती दिन व नागपंचमी हे दोन्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.नाईक मॅडम यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि लोकनेते  यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.तसेच नाग पूजन करण्यात आले.
यावेळी शाळेतील शिक्षिका सौ.प्राची गगनग्रास यांनी क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती दिली. क्रांती दिना निमित्ताने इ.४थी तील प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी व शाळेतील शिक्षकांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.नाईक मॅडम यांनी क्रांती दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधून देशासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या व देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या विविध क्रांतीवीरांविषयी माहिती दिली तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कशाप्रकारे देश सेवा करू शकतो हे विविध उदाहरणातून विद्यार्थ्यांना समजावून दिले. नागपंचमी या सणाची माहिती शाळेतील शिक्षक श्री.आशिष मांडवकर यांनी सांगितली.
नागपंचमी निमित्ताने विद्यार्थ्यांना सापांविषयी माहिती देण्यासाठी शाळेचे माजी पालक सर्पमित्र श्री.शिवराज प्रभाकर शिर्के यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्री.शिर्के यांनी विद्यार्थ्यांना सापांची शरीर रचना तसेच सापांची सामान्य माहिती देवून स्लाईडच्या माध्यमातून सापांच्या विविध प्रजातींविषयी माहिती दिली.विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेतली. श्री.शिर्के यांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. संगिता नाईक यांच्या हस्ते भेटवस्तू देवून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्रीम.नेहा पाटील यांनी केले.
सर्वांना देश कार्याची प्रेरणा देणारा  क्रांती दिन व सापांविषयी जाणीव जागृती निर्माण करणारा नागपंचमी सण असे दोन्ही कार्यक्रम शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.

 

आणखी वाचा