दापोली, दि. १७ (प्रतिनिधी): दापोली शहरातील ज्ञानदीप बालवाटिका व प्राथमिक विद्यामंदिर दापोली या शाळेत प्रशालेय 16 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी विद्यार्थिनींना या श्रावण महिन्यात असलेल्या सणाचे महत्त्व कळाव बहिण भावांमधील नातं अधिक दृढ करणारा संदेश विद्यार्थ्यांनाही समजावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी संस्थेचे सेक्रेटरी सुजय मेहता, मुख्याध्यापक महेश शिंदे व उपस्थित पत्रकारांचे औक्षण करून रक्षाबंधन केले. या कार्यक्रमाला दापोली येथील जेष्ठ पत्रकार प्रसाद रानडे, राधेश लिंगायत,महेश महाडिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपपूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. रक्षाबंधन हा भावा बहिणीचा नातं अधिक दृढ करणारा सण म्हणून ओळखला जातो. बहिण भावाला राखी बांधते याच महत्त्व यावेळी संस्था सेक्रेटरी सुजय मेहता यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते. हिंदूच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पोर्णिमेला हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये केला जातो. भावा-बहिणीच्या स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच सांभाळ कर असा संकेत दिला जातो. प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेणे अशी ही पारंपारिक प्रथा आहे. हा सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला संदेश आहे असे या सणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थी विद्यार्थिनींना सांगितलं. ज्ञानदीप बालवाटिका व प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक मुख्याध्यापक महेश शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी विदयाथ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये इ. १ लीतून कु. नित्या निशांत शिर्के इ. २ रीतून ऊरंभ बिपीन कामतेकर इ. ३ रीतून स्पृहा राकेश पुजारे, ओवी हेमंत पेटकर, प्रिन्स कबनूरकर,अस्था राकेश काटकर, आदित्य नामदेव मोटे, श्रावणी निलेश कराड, श्राविका गंगाधर चौगले या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन करताना या राख्या आम्ही शालेय उपग्रहातून बनवले आहेत टाकाऊ पासून टिकाऊ करण्याचा उपक्रम हा शाळेत आम्ही केला आहे आणि आज हा रक्षाबंधन दिन आम्हाला साजरा करता आला त्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
उपस्थित पत्रकार प्रसाद रानडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत या शालेय उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं उपस्थित पत्रकारांच्या वतीने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना रक्षाबंधन कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. आपण जीवनात खूप मोठे व्हा मात्र आपल्या आई वडील व गुरुजनांना कधीही विसरू नका असे शब्दात आपले मनोगत रानडे यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांनी तयार केलेलमा टाकाऊ वस्तूपासून राखी बनवणे या उपक्रमाचे कौतुक सुजय मेहता यांनी केलं.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक महेश शिंदे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दवंडे यांनी केले. त्या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक व बालवाटिकेच्या सर्व शिक्षक व शिक्षिकांनी यशस्वीरित्या मेहनत घेतली








