दापोली, दि. १७ (प्रतिनिधी): भाजपाने उमेदवारीची मागणी करणे यामध्ये गैर नाही लोकशाही आहे मात्र मला विश्वास आहे की दापोली मंडणगड खेड विधानसभेची उमेदवारी मला जाहीर होईल आणि मग त्यानंतर आम्ही महायुती म्हणून हातात हात घालून एकत्र काम करू असा विश्वास व्यक्त केला. आपल्याबरोबर पालकमंत्री उदय सामंत, महाडचे आमदार भरत गोगावले हे व आम्ही कोकणातले सगळे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत आलो आहोत त्यामुळे आम्हाला काळजी नाही. रत्नागिरी जिल्ह्यात महायुती असतानाही भाजपाकडूनही उमेदवारीची मागणी होत आहे यावर बोलताना आमदार योगेश कदम यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री लाडके भाऊ योजनेचा शुभारंभ झाला या कार्यक्रमानंतर कदम यांनी पत्रकार जवळ संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातील बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळू नये म्हणून विरोधकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे राज्यातील जनता काय समजायचं आहे ते समजल आहे अशा शब्दात आमदार योगेश कदम हे विरोधकांनाही टोला लगावला आहे. शरद पवार यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत मग आता महाविकास आघाडी करून मुख्यमंत्री पदासाठीचे नाव उद्धव ठाकरे यांच जाहीर का करण्यात आला नाही असाही सवाल करत आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. महाविकास आघाडी कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अगर न करावा पण पुन्हा एकदा आमची महायुतीच सत्तेत येईल असाही विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी दापोलीचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंबे, निवासी तहसीलदार श्री.आडमुठे,सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील खरात तसेच या योजनेच्या अशासकीय सदस्य काजोल लोखंडे तसेच दापोली,खेड,मंडणगड मधील महिला अंगणवाडी सेविका, तलाठी मंडळ अधिकारी महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांनी शिवसेनेचे युवा नेते आमदार योगेश कदम यांना औक्षण करत केले रक्षाबंधन
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री लाडके भाऊ योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात प्रांताधिकारी तहसीलदार यांचे उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी उपस्थित महिला वर्गांनी समस्त महिला वर्गाच्या वतीने प्राथमिक स्वरूपात पाच महिलांनी औक्षण करून आमदार योगेश कदम यांना रक्षाबंधन केलं. या कार्यक्रमात महिलांनी केलेल्या या रक्षाबंधनाच्या स्नेहाने आमदार योगेश कदमही क्षणभर भारावून गेले, मला अगोदर माहिती असते तुम्ही राखी बांधणार आहात तर मी येताना गिफ्ट घेऊन आलो असतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इतकंच नाही तर आपल्याला कार्यक्रमाला यायला उशीर झाल्याने त्यांनी उपस्थित महिलांची दिलगिरीही व्यक्त केली. पाच महिलांनी प्रातिनिधिक स्वरूपात शिवसेनेचे युवा नेते आमदार योगेश कदम यांना औक्षण करत रक्षाबंधन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.








