विशेष दिव्यांग मुलांचा स्वातंत्र्यदिन सोहळा संपन्न

जोगेश्वरी, दि. १७ (प्रतिनिधी): नितिमा फाऊंडेशनच्या संस्थापक सायली मसूरकर व दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असलेल्या रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाने विशेष दिव्यांग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालविकास विद्यामंदिर, जोगेश्वरी (पूर्व) शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख आमंत्रित सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. नितिमा फाऊंडेशनच्या माध्यमातून विशेष दिव्यांग मुलांना शैक्षणिक, व्यावसायिक, दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त प्रशिक्षण, स्वावलंबनासाठी आर्थिक उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देणे तसेच व्यक्तिमत्व विकासासोबत सामाजिक आनंद देणारे विविध उपक्रम राबविले जातात.
सामाजिक भावनेने प्रेरित अव्देत मसूरकर, निता सावंत,निलेश तरळ, वासंती भट,मृणाली सावंत, अश्मिका गोताड या तरूण तडफदार संचालक मंडळा सोबत शिक्षकांनी उत्कृष्टपणे उपक्रमाच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळली होती. लेझिम सादर करताना मुलांच्या पालकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला.

आणखी वाचा