गुहागर, दि. १८ (उत्तम पवार) : समता सैनिक दल प्रेरित, एस. एस. डी. ट्रस्ट संचलित, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले सामाजिक विकास केंद्र शृंगारतळी, ता. गुहागर या केंद्राला एक तरुण यशस्वी व्यावसायिक सुमेध एस. मोहिते ( पाथर्डी, ता. चिपळूण) यांनी इन्व्हर्टर कम युपीएस (अंदाजे किंमत रुपये 15 ते 16 हजार) संच भेट दिला.
सामाजिक कार्याची उत्तम जाण आणि तळमळ असलेले नि:स्वार्थी, परखड आदर्शवत व्यक्तिमत्व, तरुणांवर चांगली वचक ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होऊनही गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य अविरतपणे सुरू असलेले चिपळूण तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील एक मोठं आणि आदरयुक्त नाव, एस. डी. मोहिते (पाथर्डी, ता. चिपळूण) यांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालवत त्यांचे सुपुत्र सुमेध एस. मोहिते यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘पे बॅक टू सोसायटी’ या संकल्पनेला हातभार लावला आहे. सुमेध हे एक यशस्वी व्यावसायिक असून तरुणांना आदर्शवत काम ते नेहमीच करत असतात. शिक्षणाविषयी अतिशय तळमळ असल्याने त्यांनी शृंगारतळी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या सामाजिक विकास केंद्राला इन्व्हर्टर कम यूपीएस संच भेट देऊन तरुणांमध्ये पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे. हा संच मिळण्यासाठी या केंद्राच्या व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष भीम मार्शल प्रमोद रामचंद्र पवार यांनी प्रयत्न केले.
सुमेध यांनी स्वतः येऊन हा संच कार्यालयाला भेट दिला. यावेळी समता सैनिक दल महाराष्ट्र राज्य मुख्य प्रशिक्षक भीम मार्शल संतोष मोहिते सर, मोहिते नर्सिंग होम (कळंबस्ते, ता.चिपळूण) च्या सर्वेसर्वा भीम मार्शल डॉक्टर साक्षी मोहिते मॅडम, भीम मार्शल अरुण चव्हाण (शासकीय ठेकेदार), या केंद्राच्या व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष भीम मार्शल प्रमोद रामचंद्र पवार, उपाध्यक्ष भीम मार्शल सुनील सखाराम जाधव (माजी सैनिक), पाट पन्हाळे ग्रामपंचायत चे लिपिक भीम मार्शल सुदेश हडकर, या केंद्राचे ऑफिस असिस्टंट भीम मार्शल शीलवंत पवार हे उपस्थित होते.
यावेळी स्थानिक व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सुमेध मोहिते यांचे व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे आभार मानून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच केंद्राला प्रथमच भेट देणाऱ्या भीम मार्शल डॉ. साक्षी मोहिते मॅडम, शासकीय ठेकेदार भीम मार्शल अरुण चव्हाण, भीम मार्शल सुदेश हडकर यांनाही पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.








