संगमेश्वर, दि. १८ (प्रतिनिधी): कोकण वासियांचं आवडतं महानदैवत गणपती! श्रावण महिना सुरू झाल्यानंतर चाहूल लागते बाप्पाची!! प्रत्येक गणपती कारखान्यात लगबग आहे रंगकाम व शेवटचा हात फिरवून मूर्ती पूर्ण करण्याची!! यामुळे माखजन भागातील कळंबूशी, बुरुंबाड, सरंद, आंबव पोंक्षे, धामापूर,शिरंबे इत्यादी ठिकाणी रात्रंदिवस जागरणे करून कामे वेळीच पूर्ण करतांना कारखानदार दिसत आहेत.
ग्राहकांच्या पसंती प्रमाणे सिंगल मूर्ती,
लालबागचा राजा,कृष्ण मूर्ती, शंकर पार्वती, घोड्यासह फेटामूर्ती, बालमूर्ती,अशा अनेक प्रकारातील मूर्ती पहावयास मिळतात.
शाडू माती,रंग साहित्य यांच्या किंमतीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाढ झाल्याचे कळंबुशी येथील कारखानदार सुनिल खातू यांनी सांगितले .








