संगमेश्वर, दि. १८ (प्रतिनिधी): क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रिडा कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगमेश्वर तालुका तायक्वांदो अँकँडमी व नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या सहकार्याने तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा 14, 17 व 19 वर्षाखालील मुले व मुली अशा वयोगटामध्ये दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब,देवरुख या ठिकाणी मोठया उत्साहामध्ये संपन्न झाली.
यावेळी तालुक्याचे आमदार शेखर निकम, तायक्वांदो अँकॅडमी उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, क्लब सदस्या रुपाली कदम,माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये,माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, बाळू ढवळे,यशवंत गोपाळ, नितीन भोसले,दुर्वा मोघे,समन्वयक अभिजीत कदम,तालुका प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्रिडा शिक्षक तानाजी कदम,श्रीकांत यादव, अंबादास जरे, साक्षी नलावडे, नवनाथ खोचरे, रेजिना काझी,समीर यादव, सागर पवार, अक्षय कांबळे व पालक वर्ग मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, पैसा फंड हायस्कूल संगमेश्वर, न्यू इंग्लिश स्कूल कसबा, दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी, न्यू इंग्लिश स्कूल देवरुख,पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूल,निवे आश्रमशाळा,लोक विद्यालय तुळसणी, मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवली, आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय देवरुख, जि.प.प्राथमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पदक प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे 14 वर्षा खालील मुले व मुली सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे- साहिल जागुष्टे, सोहम मालगुंडकर, सान्वी रसाळ, श्रावणी इप्ते, यज्ञा गजबार, अभिषेक रसाळ, यशराज कटके,मंथन चव्हाण, प्रथमेश शेट्ये रौप्य पदक विजेते खेळाडू- हर्षदा कुंभार, तनिष्का आनेराव, अजिंक्य शिंदे, वेदांत येङगे, सोहम यादव, प्रथमेश कारेकर,कांस्य पदक विजेते खेळाडू-आयुष वाजे, शौर्य लोध.
17 वर्षा खालील मुले व मुली सुवर्णपदक विजेते खेळाडू- श्रद्धा देवरुखकर, सान्वी जागुष्टे, समीक्षा पाटील, समृद्धी घडशी, आर्या इप्ते विदिशा जाधव, सीया सागवेकर, मृणाल मोहिरे, अथर्व चव्हाण.
19 वर्षा खालील मुले व मुली सुवर्णपदक विजेते खेळाडू- तनिष खांबे, गंधर्व शेट्ये, ओम घाग.या मधील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड दिनांक. 29 व 30 ऑगस्ट 2024 रोजी ङेरवण येथे होणार्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना पदक व प्रथम,द्वितीय, तृतीय चषक क्लबचे सदस्य ॲ.गजानन सुरेश मोघे यांनी कै.सुरेश कृष्णाजी मोघे यांच्या स्मरणार्थ कडून देण्यात आले. या स्पर्धेमध्ये यांनी अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला,पैसा फंड हायस्कूल संगमेश्वर यांनी द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावला, मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवली यांनी तृतीय क्रमांकाचा चषक पटकावला.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, गायत्री शिंदे, सुमित पवार, सोहम लाड,यांनी पंच म्हणुन काम पाहिले जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झालेल्या तायक्वांदो पट्टूंना संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, नगरपंचायत क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, तालुका अँकॅडमी उपाध्यक्ष परेश खातू, खजिनदार दिपक हळबे, सदस्य श्रीकांत बेडेकर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, क्लबच्या सदस्या स्वाती नारकर, अनुजा नार्वेकर, तांत्रिक प्रमुख चिन्मय साने, सिनियर खेळाडू सौरभ वनकर, पंकज मेस्त्री, सिद्धी केदारी, अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे, राजेंद्र केदारी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पदाधिकारी सर्व नगरसेवक आदींनी शुभेच्छा दिल्या.








