संगमेश्वर, दि. १८ (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीत उत्तम योगदान देणाऱ्या कलांगण संगमेश्वर, या संस्थेची स्थापना श्री अमोल लोध यांच्या मूळ संकल्पनेतून २१ जानूवारी २०२० रोजी करण्यात आली.
त्रैमासिक सभा, विविध संकल्पांवर आधारित गायनाचे कार्यक्रम सुरू केलेल्या ,या संस्थेने कोविड काळात स्वस्त न बसता संगमेश्वर तालुक्यात असलेल्या व विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींची ऑनलाईन मुलाखती असलेले संगमेश्वर संपदा ही संवाद मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. निबंध कानिटकर संवादक असलेल्या या मालिकेचे अर्धशतकापर्यंत पोहोचणारे भाग, असे वैशिष्ट्य होय.
मंदिर कसे पहावे …हे दाखविणारा,तालुका स्तरीय आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा, मोबाईल वरील फोटोग्राफी मूर्ती आरास स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेत, ‘सफर संगमेश्वर देवरुखची’ ‘ शिल्पकथा करणेश्वराची’ व ‘स्वातंत्र्य बॅ. विनायकराव सावरकर यांचे संक्षिप्त चरित्र’ या तीन पुस्तकांचा देखणा प्रकाशन समारंभ करणाऱ्या संस्थेने गेली दोन वर्षे कर्णेश्वर महोत्सव यशस्वीपणे आयोजित करून केलेल्या भरीव कार्याची दखल आमदार शेखर निकम व संगमेश्वर तालुक्याच्या २०२४ च्या आमसभेने घेऊन नुकत्याच पडलेल्या आमसभेत नुकताच या संस्थेचा गौरव केला.
आमदार महोदय यांच्या हस्ते कलांगण संगमेश्वर संस्थेच्या वतीने हा सत्कार श्रीनिवास पेंडसे यांनी स्विकारला.








