चिपळूण, दि. २१ ( प्रतिनिधी):: रत्नागिरी सीए ब्रॅंचतर्फे खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रॅण्ड येथे अर्थसंकल्प विवेचन, आर्थिक गुन्हे व टॅक्स ऑडिट फॉर्ममधील बदल याविषयी चर्चासत्र पार पडले. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून पुण्याचे वक्ते सीए वासुदेवन, सीए रेखा धामणकर, सीए धीरज दंडगवल व सीए चारुदत्त केंढे यांचे मार्गदर्शन लाभले.
चर्चासत्राचे प्रास्ताविक करताना सीए ब्रॅंचच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
प्रथम सत्रात सीए वासुदेवन यांनी अर्थसंकल्पामधील बारकावे व त्यामुळे होणाऱ्या विविध बदलांचे विवेचन केले. दुसऱ्या सत्रात सीए रेखा धामणकर यांनी वाढत्या आर्थिक गुन्ह्यांचा पार्श्वभूमिवर सीएंनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात सीए धीरज दंडगवल व सीए चारुदत्त केंढे यांनी टॅक्स ऑडिट फॉर्म थ्री सीडीमध्ये झालेल्या बदलांवर मार्गदर्शन केले.

यात चर्चासत्रासाठी अध्यक्ष म्हणून सीए मंदार लेले, सीए शशिकांत काळे व सीए सुनील विंचू यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला चिपळूण, खेड व दापोली येथील सीए सदस्यांसह रत्नागिरी सीए ब्रॅंचचे उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर व माजी अध्यक्ष सीए मुकुंद मराठे उपस्थित होते. सीए स्वाती ढोल्ये व सीए अंजली फाटक यांनी सूत्रसंचालन केले. सीए सुमेध करमरकर यांनी आभार मानले.