सरस्वती विद्यामंदिर जामसूदमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

गुहागर, दि. २१ (प्रतिनिधी): सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर, जामसूद या विद्यालयात मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या गौरव सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, शाळेचे माजी विद्यार्थी व डोंबिवली येथील यशस्वी उद्योजक श्री. मंगेश कोलथरकर यांच्या कडून मागील दहा वर्षांपासून शालांत परीक्षेतील टॉप पाच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्याची परंपरा यंदाही पुढे चालू ठेवण्यात आली.
कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी म्हणून केंद्रप्रमुख श्री. देवळेकर सर, तसेच श्री. मंगेश कोलथरकर, श्री. महेश जामसूतकर, श्री. सुधीर जामसुतकर, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे प्रतिनिधी श्री. अनंत सुर्वे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात डेरवण ट्रस्ट कडून विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. एकूण 850 वह्या देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री लाड सर व सूत्रसंचालन श्री. दोलतोडे सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. माणगावकर सर यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
1. प्रथम क्रमांक – कु. अश्विनी दोलतडे(94.80%)
2. द्वितीय क्रमांक – आदर्श कांबळे(84.80%)
3. तृतीय क्रमांक – अमृता घर्वे(83.80%)
4. चतुर्थ क्रमांक – रुचिता रांगळे(81.80%)
5. पाचवा क्रमांक (विभागून) – कु. मनाली पाडावे व वेदांत साळवी (दोघांनाही 80% गुण)
विद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
 या कार्यक्रमातच विद्यालयात नव्याने दाखल झालेल्या व नासा अवकाश संशोधन केंद्राला भेट देऊन आलेल्या कुमारी पूर्वा जाधव या विद्यार्थिनीला सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले
तसंच शाळेला सातत्याने आर्थिक मदत करणारे श्री. मंगेश कोलथरकर आणि डेरवण ट्रस्ट यांचेही विशेष आभार मानण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

आणखी वाचा