चिपळूणच्या महेक अडरेकर हिला BPT पदवी

चिपळूण, दि. २७ (प्रतिनिधी):  तालुक्यातील खडपोली गावातील माजी सरपंच मुस्कान अडरेकर व मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरी चे अध्यक्ष, चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांची कन्या महेक अडरेकर हिने “राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, कर्नाटक” येथून “बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (BPT)” ही पदवी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण केली आहे. या यशामुळे महेकला आता “डॉ.” हा गौरवपूर्ण उपसर्ग लावण्याचा मान मिळाला आहे.

महेकची संपूर्ण शैक्षणिक वाटचाल ही सदैव प्रथम श्रेणीत राहिलेली असून, तिच्या यशामागे तिचा स्वतःचा आत्मविश्वास, ध्येयावर अढळ श्रद्धा, कठोर परिश्रम, पालकांचा विश्वास व साथ, तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन हे सर्व घटक कारणीभूत ठरले आहेत.

डॉ. महेक अडरेकर हिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण चिपळूण तालुक्यासाठी व मुस्लिम समाजासाठीही गौरवाचे आणि प्रेरणेचे ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करत असतानाच ती आपले ज्ञान समाजहितासाठी वापरण्याचा मनोदय बाळगते.डॉ. महेक हिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

आणखी वाचा