पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष अस्लम खान आणि पाजपंढरी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक जयंत सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत वाचनालयाला भेट देऊन वाचनाचा आनंद घेतला. तसेच शाळेच्या ग्रंथालयात एक तास पुस्तकांचे वाचन केले.
उर्दू निबंध स्पर्धेत अलिना इम्रान काजी हिने प्रथम, आफरा अजिम झोंबडकर हिने द्वितीय, तर सिद्दिक युसूफ नुरानी याने तृतीय क्रमांक मिळविला. इंग्रजी निबंध स्पर्धेत तहरीम तौसिफ पंतावे प्रथम, नाज सलीम चिपळूणकर द्वितीय आणि जोया जब्बार अकबाणी तृतीय आली.
वक्तृत्व स्पर्धेत आनम नईम गावंकरकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धेत सिमरन इम्रान झोंबडकर प्रथम आली. रांगोळी स्पर्धेत रिदा शब्बीर आरेकर व हुजेफा रफीक झोंबडकर यांच्या गटाने प्रथम क्रमांक मिळविला.
यावेळी जुबेर मुल्ला आणि मौलाना इर्शाद खान यांनी कुराण पठणासंदर्भात मार्गदर्शन केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला प्रथमोपचार पेटी भेट दिली. माजी विद्यार्थिनी मुबश्शिरा जहूर गावंकरकर यांनी पुस्तके भेट दिली. जयंत सुर्वे यांनी वाचनाचे महत्त्व आणि डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी पुस्तक खरेदीसाठी शाळेला एक हजार रुपयांची देणगीही दिली.
मुख्याध्यापक आसिफ भाटकर यांनी सुर्वे यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार केला. यापुढे कार्यक्रमांत पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके देऊन सत्कार करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष अस्लम खान, उपाध्यक्ष इर्शाद महालदार, स्कूल कमिटी अध्यक्ष सईद चिकटे, प्राचार्य अलमास नाखवा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुबीन बामणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक आसिफ भाटकर यांनी केले.








