निवळी (सावर्डे) येथे बिबट्या घरातील पडवीत शिरला

सावर्डे, दि. ३१ : मौजे निवळी कातळवाडी येथे आज बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी पहाटे ४.१० वाजणेच्या सुमारास श्री. जयराम रा. मोरे यांचे घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवोमध्ये बिबट्या आल्याची माहितो पोलीस पाटील निवळी यांनी भ्रमणध्वनीव्दरे वनपाल सावर्डे यांना दिली.

कळविलेल्या माहितीचे अनुषंगाने सदरील ठिकाणी वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा कोंबड्याच्या वासाने राहते घराचे मागील बाजूस असलेल्या (पडवी) खोलीमध्ये बसला असल्याचे दिसून आले. सदरचे खोलीचे दारावरती अर्ध्याभागावर लाकडी फळ्या व पत्र्याने बंद करुन दारासमोर पिंजरा लावून बिबट्या सुखरुप जेरबंद करण्यात यश आले.

बिबट्याला पिंजऱ्यामध्ये सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्यानंतर पशूवैद्यकीय अधिकारी चिपळूण यांनी पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा साधारणपणे २.५ ते ३ वर्षाचा असून ती मादी असून तीला नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे करिता सुस्थितीत असलेची खात्री झाल्याने वन विभागाचे बचाव पथकाने सदर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

सदरचे बचावकार्य विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) श्री. वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीम. राजश्री चं कीर, वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण, व त्यांचे अधिनस्त कर्मचारी श्री. उमेश आखाडे वनपाल सावर्डे, श्री. अनंत मंत्रे वनरक्षक नांदगाव, श्रीम. अश्विनी जाधव वनरक्षक गुढे, श्री. दत्ताराम सुर्वे वनरक्षक, श्री राहूल गुंठे वनरक्षक कोळकेवाडो, श्री. नंदकुमार कदम वाहनचालक व श्री गणेश भागडे तसेच रेस्क्यू बचाव पथकामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी, स्थानिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

आणखी वाचा