६४ वी हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा : रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम; ‘ईठ्ठला’ दुसरे

मुंबई, दि. १२ : ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्राचा निकाल जाहीर झाला असून समर्थ रंगभूमी, रत्नागिरी प्रस्तुत ‘अग्निपंख’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर वीरशैव समाज, लांजा यांचे ‘ईठ्ठला’ हे नाटक द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही दोन्ही नाटके अंतिम फेरीसाठीही निवडली गेली आहेत.

इतर निकाल पुढीलप्रमाणे —

तृतीय पारितोषिक :
खरडेवाडी क्रीडा मंडळ, मेर्वी — इम्युनिटी (द व्हॉइस ऑफ टॉलरन्स)

व्यक्तिगत पारितोषिके

दिग्दर्शन :

प्रथम – ओंकार पाटील (अग्निपंख)
द्वितीय – अमोल रेडीज (ईठ्ठला)
तृतीय – संदेश तोडणकर (इम्युनिटी)

प्रकाशयोजना :
प्रथम – साई शिर्सेकर (अग्निपंख)
द्वितीय – दयानंद चव्हाण (ईठ्ठला)
तृतीय – अभिजित डोंगरे (इम्युनिटी)

नेपथ्य :
प्रथम – प्रवीण धुमक (अग्निपंख)
द्वितीय – संदीप सावंत (ईठ्ठला)
तृतीय – सत्यजीत गुरव (येऊन येऊन येणार कोण?)

रंगभूषा :
प्रथम – उदयराज तांगडी (अग्निपंख)
द्वितीय – गजानन पांचाळ (ईठ्ठला)
तृतीय – नरेश पांचाळ (इम्युनिटी)

संगीत दिग्दर्शन :
प्रथम – ओंकार बंडबे (अग्निपंख)
द्वितीय – प्रदीप कांबळे (ईठ्ठला)
तृतीय – योगेश मांडवकर (इम्युनिटी)

वेशभूषा :
प्रथम – चैताली पाटील (अग्निपंख)
द्वितीय – संतोष डोर्लेकर (ईठ्ठला)
तृतीय – विश्वनाथ नवाले (इम्युनिटी)

उत्कृष्ट अभिनय (रौप्यपदक) :
मिनार पाटील (अग्निपंख)
ऋचा भुते (अग्निपंख)

अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे :
अमोल रेडीज (ईठ्ठला), जयू पाखरे (ऑक्सिजन), संदेश तोडणकर (इम्युनिटी), गोपाळकृष्ण जोशी (येऊन येऊन येणार कोण?), अर्चना पेणकर-पांचाळ (ईठ्ठला), तन्वी शिंदे (इम्युनिटी), डॉ. नेहा उकिडवे (मंगलाक्षता), निवेदिता मणचेकर (ऑक्सिजन)

स्पर्धा उत्साहात पार पडली
१० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२५ या कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १८ नाट्यप्रयोग सादर झाले. परीक्षक म्हणून विश्वास पांगारकर, सुनिल जगताप आणि संगिता टेकाडे यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले असून स्पर्धेत सहभागी सर्व कलावंतांनी भविष्यातही उत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आणखी वाचा