चिपळूण, दि. २१ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी हा पक्ष बकासुर जनता पार्टी पक्ष झाला आहे राज्यात मोठमोठे पक्ष आणि पक्षाचे प्रमुख नेते बकासुरासारखे गिळले आहेत आहेत येत्या सात मे रोजी आपल्याला या बकासुराचा वध करायचा आहे. तुमचा हा अनंत गीते गेली सहा वेळा खासदार झाला पण त्या वेळचा आणि आजचा आनंद गीते आहे असाच आहे मी माझ्या राजकीय जीवनात काही कमवले असेल तर एकही भ्रष्टाचाराचा आरोप न होता स्वच्छ प्रतिमा जपणे हेच मी कमविले आहे. शरद पवार साहेबांनी सुनील तटकरे यांना सर्व काही दिलं तरी त्यांच्याशी प्रामाणिक राहिले नाहीत ते तुमच्या आमच्याशी काय राहणार यांनी स्वतःच्या घरातच राष्ट्रवादी पक्ष वाढवला यांच्या घरातच सर्व पद आहेत अजून यांना काय पाहिजे होते मागच्या वेळी आमदार भास्कर जाधव तटकरे सोबत होते म्हणून ती निवडणूक भास्कर जाधव विरोधात अनंत गीते अशी होती आता भास्कर जाधव आपल्या सोबत आहेत रमेश कदम आपल्या सोबत आहेत आपण एकत्र आहोत मग आता आपल्या पासघाला कोण उरेल काय आता तर भास्कर जाधव माझ्यासोबत आहेत मला आता कसली चिंता नाही आपली जर एकजूट झाली ही वज्रमूठ आपल्या इंडिया आघाडीची वज्रमूठ आहे. लोकसभा निवडणुकीत देशामध्ये इंडिया आघाडीची वज्रमूठ सिद्ध होणार आहे आणि भारतीय जनता पक्ष नेस्तानाभूत झाल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघात टीका रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार अनंत गीते यांनी केली.
३२ रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची रविवारी सायंकाळी वहाळ ग्रामपंचायत समोर शेकडो महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कळंबट जिल्हापरिषद गटाची जाहीर सभा संपन्न झाली या वेळी माजी खा. अनंत गीते यांनी बोलताना खा. सुनील तटकरे आणि महायुतीच्या नेत्यांचा जोरदार समाचार घेतला या सभेला माजी खासदार अनंत गीते ,शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार रमेश कदम, गुहागर विधानसभा क्षेत्र प्रमुख महेश नाटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गुहागर विधानसभा अध्यक्ष योगेश शिर्के ,उपाध्यक्ष निलेश चव्हाण ,वहाळ ग्रामपंचायत सरपंच मंगेश शेलार, गुहागर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, चिपळूण तालुका शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत, जयराम पवार, शंकर कदम, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली. हा मेळावा यशस्वी केल्याबद्दल संदीप सावंत यांचे खासदार अनंत गीते आणि मान्यवरांनी विशेष कौतुक केले. ७ मे ला देशाच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक आहे लोकशाही वाचवायची असेल संविधान वाचवायचे असेल तर ७ मे रोजी संविधानाचे मारेकरी आहेत त्यांना दूर करावंच लागेल म्हणून राष्ट्रहिता करिता या कोकणच्या हिताकरिता ७ मेला आपण आपल्या सर्वांनी मतदान करायचा आहे असे आवाहन अनंत गीते यांनी केले.
देशात भाजपा सरकार शासकीय यंत्रणा हाताशी धरून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून सर्वत्र निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न करीत आहेत भाजपाने विविध पक्षाच्या लोकांना आपल्या पक्षात येण्यासाठी शासकीय यंत्रणेचा धाक दाखवण्याचे शस्त्र वापरण्याचे काम चालविले आहे देशाच्या लोकशाहीला ही प्रवृत्ती भविष्यात घातक आहे भाजपाचा हा कुटील डाव वेळीच हाणून पाडण्यासाठी या लोकसभेला निवडणुकीत आपण अनंत गीते यांच्यासारखा योग्य उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे असे आवाहन माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या भाषणात केले. अनंत गीते खासदार असताना लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे झाली वेगवेगळ्या योजना येथे राबविण्यात आल्या आम्ही स्वतः शैक्षणिक संस्थांना मदत केली आहे गीते यांचे मतदारसंघांमध्ये विकास कामांकरिता बारीक लक्ष असायचे गीते यांनी मतदारसंघांमध्ये काय केले विरोधकांनी येऊन माहिती घ्यावी नंतर बोलावे असे प्रति आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी विरोधकांना केले.या सभेला बाळशेठ जाधव,लक्ष्मण कोकमकर, रमेश कुंभार, अमोल पिरदनकर, दिनेश वहाळकर, सचिन जंगम, मनोज डिके, , श्याम साळुंखे, राजेंद्र दळवी, महादेव चव्हाण, संभाजी कदम, दिलीप कातकर, विक्रम घाणेकर, दत्ता भुवड, विजय नेवरेकर, रघुनाथ सावंत, संदीप खापरे, विजय बेंडल ,यशवंत जावळे,मेघ सावंत, सुरेश कांबळे,दिलीप कांबळे, बबन दुर्गुळे, विलास सावंत, दीपक कदम, शशिकांत राणीम, विभागप्रमुख श्री रमेश कुंभार, माजी पंचायत समिती सदस्या सौ, संजीवनी खापरे,राजू दळवी, दिनेश वहाळकर, उपतालुकाप्रमुख लक्ष्मण कोकमकर, उपविभागप्रमुख दादा सकपाळ, शाखाप्रमुख अमोल पिरदनकर, राजेंद्र घाग, आत्माराम पुणवत, दिपक तांबे, अविनाश सावंत, नितीन घाग,रुपेश जनार्दन घाग आणि महविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








