अबब! विठोबा बोलू लागला’ आता कोकण दौऱ्यावर : प्रभाकर मोरे प्रमुख भूमिकेत

रत्नागिरी, दि. २६ (नितिश खानविलकर): अबब! विठोबा बोलू लागला हे 30 वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेल, लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक आता नव्या स्वरूपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नाटकाचा कोकण दौरा सुरु होत आहे. 1 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता स्वा. वि. दा.सावरकर नाट्यगृह रत्नागिरी, 2 मे रोजी रात्री 9.30 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण तर 3 मे रोजी रात्री 9.30 वाजता रसिकरंजन नाट्यमंदिर दापोली येथे नाटकाचे प्रयोग होणार आहेत. आगाऊ तिकीट विक्री 27 तारीख पासून सुरुवात होत आहे.

कोकणचे पारसमणी अशी ओळख असणारे हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे या नाटकात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अनेक हिंदी मराठी मालिका तसेच मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा तगडा अनुभव असणारे प्रशांत गिरकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. तर नमिता वागळे गिरकर यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे लेखन नीलकंठ नांदुरकर यांनी त्यावेळी एका स्पर्धेसाठी केले होते मात्र व्यावसायिक रंगभूमीवर देखील या नाटकाने खूप नावलौकिक मिळवलं.

हे नाटक बालनाट्य असले तरी सर्वच स्तरातील मंडळींसाठी उत्तम मनोरंजन आहे. सर्व कलाकार, बालकलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण नाटकाची टीम विठ्ठलाचे दर्शन घडवेल असे दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी सांगितले. सध्या मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे याठिकाणी या नाटकाचे हाऊसफुल गर्दीत प्रयोग सुरु आहेत. तसेच कोकण दौरानंतर या नाटकाचा महाराष्ट्र दौरा सुरु होणार असल्याचे निर्माती नमिता गिरकर यांनी सांगितले.

https://www.instagram.com/abbvithobabolulagla?igsh=czRxanp1bGRzOHE1

आणखी वाचा