चिप.ळूण (ओंकार रेळेकर) मुलुंड मुंबई येथे कुणबी समाज बांधवांकरीता समाजाचे वस्तीगृह व्हावे अशी इच्छा समाज बांधवांनी व्यक्त केल्यावर खा.सुनील तटकरे यांनी या विषयात तात्काळ लक्ष देऊन निधी उपलब्ध करून दिला . आमचे नेते खा.सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून येथे कुणबी समाज वस्तीगृह होऊ शकले याचे आम्हाला समाधान असल्याचे राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री ना.आदिती तटकरे यांनी सांगितले.
रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महायुतीची जाहीर सभा तालुक्यातील पंधरागाव येथे शनिवारी दुपारी संपन्न झाली. या मेळाव्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. अदिती तटकरे ,महाराष्ट्राचे शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई, कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम,माजी आ.विनय नातू,शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण,राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव, उपसभापती अण्णा कदम,जि.प माजी सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख अरविंद चव्हाण ,जि. प माजी सदस्य सुनील मोरे ,भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा नेत्या सौ.चित्राताई चव्हाण, गुहागर विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रकांत चाळके, राष्ट्रवादी खेड तालुका अध्यक्ष सतू कदम, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश लाड,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षे समाजाचेच नेतृत्व असताना देखील कुणबी बांधवांची वस्तीगृहाची इच्छा अपूर्ण राहिल्याने खंत या मंडळींनी तटकरे यांच्याकडे व्यक्त केली होती मुंबईमधील मुलुंड येथे कुणबी समाजाची हक्काची एक जागा गेल्या अनेक वर्षापासून उपलब्ध होती. या जागेमध्ये कुणबी समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह व्हावं अशी इच्छा कुणबी समाज बांधवांनी खा.सुनील तटकरे साहेब यांच्याकडे व्यक्त केली होती तटकरे साहेब यांनी तात्काळ या मागणीचा पाठपुरावा करीत संबंधित मंडळींकडे संपर्क करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे प्रस्ताव ठेवला व या कुणबी समाज वसतिगृहासाठी पाच कोटीचा निधी तात्काळ उपलब्ध केला होता .नंतर त्या निधीमध्ये कमतरता वाटू लागल्याने त्याच्यामध्ये अधिक भर ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकली आणि जवळपास १२ कोटीचा निधी या ठिकाणी खर्चिक पडून मुलुंड मध्ये एक वसतिगृह कुणबी समाजाच्या मुलांसाठी उपलब्ध झाले आहे हे खा.सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले असल्याने आम्हाला समाधान असल्याचे ना.आदिती तटकरे यांनी सांगितले.
माझ्या माता भगिनींना मला आवर्जून सांगायचंय की खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचा भवितव्य घडवायचे असेल तर आज जे तुम्हाला उपलब्ध झालं नाही ते तुमच्या पुढच्या पिढीला तरी उपलब्ध व्हावं अशी एक प्रामाणिक इच्छा आमची आहे.शिक्षणाचे रोजगार असेल गावामधल्या मूलभूत सुविधा असतील या जर आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचे असल्या तर आपल्याला महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे साहेबांना निवडून आणायचे आहे. त्याचं कारण असं की आज ज्या वेळेला त्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करतील त्यावेळेला ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून नाही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही तर महायुतीचे खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि म्हणून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या या भागामध्ये अधिकार अधिक विकास कामे आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला स्थानिक रोजगार त्या ठिकाणी वाढवायचा आहे त्या दृष्टीकोनातून आपल्याला आपल्या देवस्थानाचा विकास करायचा आहे आपल्याला मूलभूत विकास करायचा आहे सर्व धर्म समभाव हा विचार मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचंय आणि म्हणून महायुतीचे उमेदवार खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना या आपल्या मतदारसंघातून या आपल्या विभागातून अधिकाधिक आपण मताधिक्य द्यावं असे आवाहन आदितीताई तटकरे यांनी केले.
ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.गुहागर संपर्क प्रमुख बापू आंब्रे,उपसभापती जीवन आंब्रे,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दत्ताराम गोटल,शिवसेना विभाग अध्यक्ष सुशांत कदम राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष अजिंक्य आंब्रे, जिल्हा सरचिटणीस दीपक गुजर,मनोहर सकपाळ ,दत्ताराम मोरे ,विलास कदम ,विष्णू कदम, सुरेश पवार, गौतम शिंदे, संजय उतेकर ,दत्ताराम मोरे, संजय जाधव, उमेश देवरुखकर योगेश आंब्रे,सुरेश रेवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद चाळके ,युवा मोर्चा अध्यक्ष सचिन चाळके ,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संकेत दुमणे, तालुका सरचिटणीस नितीन मोरे, तालुका सचिव किरण आंब्रे, स्वप्निल गुरव, बाबा पडवेकर ,संदेश म्हापदी संजय झडेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.








