मोदी चुटकीसरशी सर्व समस्या सोडवतात तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?: प्रियंका गांधी

मोदीजीदेशात ७० वर्षात काहीच झाले नाही तर १० वर्ष सरकार असताना तुम्ही काय केले ?

संविधानाने सर्वसामान्य जनतेला दिलेले अधिकार कमी करण्यासाठीच संविधान बदलण्याचे भाजपाचे षडयंत्र.

लातूर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार शिवाजी काळगेंच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची उदगीरमध्ये जाहीर सभा.

मुंबईदि. २७ : देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहेकेंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदी सरकारने ती भरली नाहीत. बेरोजगारीबरोबरच महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोलडिझेल,गॅस सिलिंडरखाद्यतेलसोनेचांदी सर्वांच्या महागाईची भेट मोदींनी दिली. शेती साहित्यावर जीएसटी लावलासर्व बाजूंनी मोदी सरकारने जनतेला संकटात टाकले आहे.नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तीमान नेते असून चुटकीसरशी सर्व समस्या सोडवतात असा भाजपाचा दावा आहे तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही असा घणाघाती हल्ला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला.

लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. प्रियंका गांधी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्या पुढे म्हणाल्या कीमहाराष्ट्राने सामाजिक न्यायाची परंपरा जपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजशाहू महाराजमहात्मा फुलेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमी आहे. काँग्रेस सरकारने मराठवाड्यात विकासाची कामे केली आहेत.पण मागील काही वर्षांपासून चित्र बदलले आहे. मोदी सरकारच्या काळात दलितांवर शोषण व अत्याचार होत आहेत पण सरकार डोळे बंद करुन बसले आहेजनता संकटात आहेदेशातील जनता संकटांचा सामना करत आहे परंतु टीव्हीवर मात्र सर्वकाही आलबेल आहे असे दाखवले जात आहे. मोदी शिवाय जगात दुसरा कोणताच नेता मोठा नाही असे भासविले जाते. पण परिस्थीती तशी नाही. मोदी सरकारने तुमच्यासाठी काय केलेरोजगार दिले कामहागाई कमी केली कातुमच्या जीवनात काय बदल घडवला कामहिलांना काही मदत केली काअसे प्रश्न विचारून प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारची पोलखोल केली. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावेनोकरी मिळावी यासाठी गरिब घरातील लोक विपरीत परिस्थीतीत मुलांचे पालन पोषण करतात. पण मोदी सरकार गरिबांना केवळ ५ किलो रेशन देतेयातून तुमच्या मुलांचे भविष्य बनणार आहे का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने गरिब श्रीमंत सर्वांना समान अधिकार दिले आहेतहे अधिकार काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला संविधान बदलायचे आहे. भाजपाचा डाव जनतेच्या लक्षात आल्यानंतर आता मोदी प्रत्येक सभेत संविधान बदलणार नाही अशी सारवा सारव करत आहे. मोदींच्या पक्षांतील खासदारांनीच संविधान बदलण्याची भाषा केली आणि भाजपात मोदींच्या परवानगी शिवाय पानही हलत नाहीत्यांच्या परवानगीनेच संविधान बदलण्याची भाषा खासदारांनी केली पण आता त्यांची भाषा बदलली आहे. नरेंद्र मोदी सातत्याने म्हणतात ७० वर्षात काहीच झाले नाहीएकवेळ मोदी म्हणतात तसे काहीच झाले नाही तर जनतेने मोदींना १० वर्ष सत्ता दिली होती या १० वर्षात तुम्ही काय केले ते तरी सांगाअसा सवाल करत नरेंद्र मोदी हे अहंकारी नेते आहेतते सातत्याने खोटे बोलतात परंतु मोदींची नौटंकी आता चालणार नाही, ‘अब की बार जनता की सरका’असा नारा देत आता जागे व्हातुमचे मत वाया घालवू नकाहा देश तुमचा आहेआज देश वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर भविष्य अवघड आहे. मतदान करण्याआधी तुमच्या भविष्याचा विचार करा व मगच मतदान कराअसे आवाहनही प्रियंका गांधी यांनी केले.

आणखी वाचा