राजापूर दि. २७, (नितिश खानविलकर) : नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे आले असताना नाटे येथील कु. बिल्वा गणेश रानडे हिने महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर केलेल्या स्वलिखित कवितेची फोटोफ्रेम दोघांनाही भेट दिली.
देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी कौतुकाने त्या कवितेवर स्वाक्षरीही केली. निवडणुकीच्या धावपळीत काही अनपेक्षित क्षण मनाला प्रसन्न करून जातात अस म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हे क्षण फेसबुक वरून शेअर केले. तसेच या लहानग्या मुलीने कवितेच्या रूपाने दिलेली पोचपावती अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देऊन गेली असेही त्यांनी म्हटले.
बिल्वा ही गोविंद गंगाधर पटवर्धन स्कुल रत्नागिरीची नववीची विद्यार्थिनी असून तिने विविध स्पर्धेत बक्षिसे मिळवली आहेत. तसेच भरतनाट्यमच्या तीन परीक्षा बिल्वा उत्तीर्ण झालेली आहे.








