रत्नागिरी, दि. 01 : रत्नागिरी राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळख असलेले किरण सामंत यांच्या बाबत विविध चर्चा सुरु असून त्या विषयाला पूर्ण विराम लागला असून किरण सामंत लांजा-राजापूर-संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले.
लांजा-राजापूर-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील मतदार गेली अनेक वर्ष किरण सामंत यांनी लांजा राजापूर मतदार संघातून निवडूक लढवावी अशी मागणी करत होते. शिवसेने कडून किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार होती मात्र काही करणास्तव ती मिळू शकली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरु आला होता. मात्र आज उद्योजक किरण सामंत यांनी लांजा-राजापूर-संगमेश्वर मतदार संघातून निवडणूक लढावणार असल्याचे जाहीर केल्याने सर्व चर्चाना पूर्ण विराम लागला आहे.
किरण सामंत यांच्या माध्यमातून लांजा-राजापूर-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाला नवीन संजीवनी मिळणार आहे. किरण सामंत यांच्या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
किरण सामंत हे महाराष्ट्र मध्ये वेगळी क्रेज असलेले व्यक्ती महत्व आहे.त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या मतदार संघात विकासाला चालना मिळणार असून कार्यकर्ते आता पासूनच कामाला लागणार आहेत. किरण सामंत जिकडे पाऊल टाकतात तिकडे माहोल करतात हा इतिहास आहे. या नेतृत्वा कोणत्याही विधानसभा मतदार संघात नेतृत्व करण्याची संधी आहे. मात्र आज किरण सामंत यांनी भरारी घेतली असून लांजा-राजापूर-संगमेश्वर मतदार संघातून निवडणूक लढावणार असल्याचे जाहीर केले आहे.








