रत्नागिरी, दि. १४ (प्रतिनिधी): फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन चे वतीने फणसोप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. फणसोप चेअरमन मनोज साळवी व व्हाइस चेअरमन समीर साळवी यांचे मागणी नुसार फणसोप व कसोप येथील शेतकऱ्यांना मोफत भातशेती बियाण्याचे वाटप करण्यात आले.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांचे वतीने दरवर्षी फणसोप व कसोप येथील शेतकऱ्यांना भातबियाणे वाटण्यात आली. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन च्या रितू छाब्रिया मॅडम कायम सर्व सामाजिक, धार्मिक, सार्वजनिक कामात आणि इतर कामाना सहकार्य करीत असते. असे चेअरमन मनोज साळवी व व्हाइस चेअरमन समीर साळवी यांनी सांगितले.
सोसायटीचे वतीने फिनोलेक्स चे डायरेक्टर रितू छाब्रिया मॅडम आणि अधिकारी श्री . नायक साहेब, आणि चिवटे साहेब, अभिषेक साळवी यांचे आभार मानण्यात आले.
त्यावेळी मा. सरपंच गिरीराज उर्फ बाबा साळवी, सोसायटीच्या सदस्या रेणुका आग्रे,सेक्रेटरी बाबू साळवी, ग्रामपंचायत सदस्य राकेश (घारू) साळवी, रितेश साळवी, प्रविण साळवी आणि शेतकरी उपस्थित होते.








