देशात माजलेल्या एक हुकुमशाह सरकारला वटणीवर आणण्याचे काम इंडिया आघाडीने केले आहे : विनायक राऊत

चिपळूण, दि. १७ : देशात माजलेल्या एक हुकुमशाह सरकारला वटणीवर आणण्याचे काम इंडिया आघाडीने केले आहे. काल-परवापर्यंत नरेंद्र मोदींना जे शिव्या घालत होते तेच या सरकारमध्ये बसले आहेत. अमित शहानी ज्यांची वेळोवेळी अव्हेलना केली तेच खांद्याला खांदा लावून आहेत. पराभवाने खचून न जाता इंडिया गाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम करून आगामी सर्व निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे वर्चस्व सिद्ध करूया असे आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी केले.

माझ्या पराभवाचे खापर मी पैसे वाटप, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर फोडणार नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेली चूक पुन्हा होणार नाही, याची दक्षता घ्या आणि पराभव मागे टाकून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या,असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी सोमवारी चिपळूण येथे इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात केले. शहरातील चितळे मंगल कार्यालय, नव्या भैरी मंदिर येथे सोमवारी सायंकाळी माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थिती मध्ये शिवसेना व महाविकास आघाडी यांच्या वतीने निवडणूक झाल्यानंतर प्रथमच चिपळूणमध्ये सर्व मतदार, महविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी यांचे आभार मानण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना विनायक राऊत बोलत होते.मनस्वी आभार मेळाव्यात शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,पदवीधर मतदार संघाचे महविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर माजी आ.रमेश कदम, उत्तर रत्नागिरी शिवसेना संपर्क प्रमुख सचिन कदम, जिल्हा प्रमुख माजी आ. संजय कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत यादव, जिल्हा प्रमुख विलास चाळके,जिल्हा प्रमुख राजू महाडिक, जि.प माजी अध्यक्ष रोहन बने, माजी अध्यक्ष संतोष थेराडे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शिवसेना तालुका प्रमुख विनोद झगडे, शहर प्रमुख शशिकांत मोदी, प्रतापराव शिंदे, माजी जि.प सदस्य बाळशेठ जाधव,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रतन पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शुक्रवारपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात ठाकरे शिवसेनेचा संपर्क दौरा सुरू झाला आहे. दोडामार्ग येथून सुरू झाला त्याची सांगता सोमवारी चिपळूण मध्ये झाली. आपण सर्वांनी घेतलेली मेहनत त्या बद्दल सर्वांचे धन्यवाद, पण पुढे आपल्याला विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत हवे. आपले आमदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आतापासून कामाला लागा. केवळ चार महिन्यात निवडणूक होईल. प्रयत्न केल्यास काहीही शक्य आहे, असे राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांना आपले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा अभिमान आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला योग्य यश मिळाले नाही. ‘अब की बार चारसो पार’, हा नारा फेल ठरला. त्यांना २४० पर्यंत मजल मारता आली. आता भाजपचे सरकार नाही, ते एनडीएचे आहे. पैसा निवडणुकीत अविचार निर्माण करतो. झालेल्या निवडणुकीतील आता पराभवातून आम्ही वाट काढणार आहोत. भाजप हा पैशांचा अविचार पचवू शकणार नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली. मिळालेली ४ लाख मते मेरिटवरील आम्हाला चार लाख मते मिळाली, ही मेरिटवरील आहेत. पण त्यांनी १४० कोटी खर्च केले आणि मिळाले किती तर ४८ हजाराचे लीड, अशी टीका राऊत यांनी केली. आपण ज्या गावातून आपल्याला मते मिळाली नाही, त्यांच्याशी पुन्हा नाळ बांधायला हवी, असेही राऊत म्हणाले.

भाजपाशी आपण पैशाने बरोबरी करू शकत नाही भारतीय जनता पार्टीने देशवासियांना लुटून हजारो कोटीचा जो पक्ष निधी गोळा केला आहे त्याची वारेवार उधळपट्टी निवडणुकीच्या माध्यमातून करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येणारी विधानसभा निवडणूक आणि सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे या धैर्याने आतापासूनच कामाला लागा असे आवाहन शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी केले आज देशाने क्रांति घडविली आहे. इतर प्रांतांनी क्रांती घडवली आहे यात कोकण सुद्धा कुठे पाठी राहणार नाही म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाचही जागांवर इंडिया आघाडीने दिलेला उमेदवार निवडून आणायचा आहे असे आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी केले.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आपण सर्व कार्यकर्त्यांनी ६२ हजार हून अधिक मतदारांची नोंदणी केली आहे आपण सर्वांनी इंडिया आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या मागे आपल्याला ताकत लावावी लागेल आपण नोंदवलेली मतदान मतदार केंद्रापर्यंत कसे येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात इंडिया आघाडीच्या माध्यमातून उमेदवार निवडून येऊ शकतात हे मतदारांनी पैशाच्या बाजारात सिद्ध करून दाखवले आहे रत्नागिरी जिल्ह्यातून आपण आघाडी मिळवली आहे ती आघाडी कायम मिळवण्यासाठी इंडिया गाडीची एकजूट आगामी सर्व निवडणुकांमध्ये दिसली पाहिजे असे आवाहन केले.

युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते,शहर अधिकारी पार्थ जागुष्टे राजू भागवत,काँग्रेसचे सुरेश कातकर, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, सुधीर शिंदे, माजी सभापती धनश्री शिंदे, शिवसेना महिला शहर संघटक वैशाली शिंदे,उपशहरसंघटक अर्चना कारेकर, उपशहर संघटक रविशा कदम, उपशहर संघटक हर्षदा पवार ,विभाग संघटक अमिता कानडे, विभाग संघटक तृप्ती कासेकर, विभाग संघटक अनामिका हरदारे तसेच महाविकास आघाडीचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांची शिवसेना संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल विनायक राऊत यांनी त्यांचा सत्कार केला तसेच उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी माजी आमदार संजय कदम यांची नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

आणखी वाचा