घाटकोपरच्या कातोडी पाडा परिसरात कोसळली दरड, सुदैवाने जीवितहानी हानी

मुंबई, दि. २१ (क्षितिज कदम): मुंबईसह उपनगरात आज सकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक संथ झाली आहे. तर डोंगराळ भागात असलेला मातीचा मलबा मुसळधार पावसामुळे खाली कोसळत असल्याने काही घरे धोकादायक स्थितीत आहे. आज घाटकोपरच्या भटवाडी येथील कातोडी पाडा परिसरात दरड कोसळली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूला असलेल्या झोपड्या खाली करण्यात आल्या आहे.
अर्धवट संरक्षण भिंत-
स्थानिक भाजपा आमदार राम कदम यांचा मतदार संघ असलेल्या या घाटकोपर भागात हा डोंगराळ भाग असून या परिसरातील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट झाले आहे काही भागाचे काम पूर्ण न झाल्याने आज पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मातीचा काही भाग खाली कोसळला. या भुस्खलनाचा धोका काही घराना जाणवत आहे. या परिसरातून लोकांची सारखी ये जा असते. आज पावसामुळे ती कमी असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र संरक्षण भिंतीचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर आज अशी घटना घडली नसती अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून होत आहे.

आणखी वाचा