रत्नागिरी, दि. १३ (प्रतिनिधी): मुंबईत विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मात्र मुंबईकराना खड्यांचा आजही सामना करावाच लागतो आहे. आज अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर काँग्रेसच्या युथ कार्यकर्त्यांनी खड्या विरोधात आपला रोष व्यक्त केला.
युथ काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सुरभी द्वीवेदी यांच्या वतीने श्रेयस सिग्नल येथे खड्या विरोधात आंदोलन करण्यात आले. दयावान योजना असे नामकरण देत युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्थानीक आमदार यांच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला.
युथच्या कार्यकर्त्यांनी हातात फलके घेत खड्या भवती स्प्रे मारत वाहनांना पुढे खड्डे आहेत असे दर्शविल्याचे आंदोलनकर्त्या सुरभी द्वीवेदी म्हणाल्या. काशी यात्रा , रक्षा बंधन वैगरे सारखे कार्यक्रम करणारा आमदार आता लोकांना नकोय तर विकास करणारा आमदार हवा असे सुरभी द्वीवेदी म्हणाल्या.








