दापोली तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर दापोलीचे वर्चस्व

 दापोली, दि. ३० :   दापोली तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धां नुकत्याच बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी येथे उत्साहात संपन्नझाल्या. हाॅलीबाॅल स्पर्धेत सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलने मुलींच्या गटात आपले वर्चस्व राखले.
17 वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना सरस्वती माध्यमिक विद्यालय ओनणवसे या संघासोबत अत्यंत चुरशीचा झाला. पण मधुरा खुपटे, सेजल गौरत, जुई जावकर, संस्कृती पाटील, संस्कृती कदम, पायल मेहता व श्रावणी बागकर यांनी उत्कृष्ट खेळ करत विजय संपादन केला. तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या गटात सुद्धा गार्गी देशमुख, फरहत रखांगे, शैली तिरपुडे, तिर्था राजेशिर्के, विधी महाडिक, प्रतिक्षा केरूळकर, सायमी मोरे, हिरण्या भांबुरे यांनीसुद्धा उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक प्राप्त करून आपल्या शाळेचे नाव उंचावले.
या सर्व विजयी खेळाडूंना संस्थाचालक समीर गुजराती, महेश सागवेकर, गजानन दाभोळे व प्रशाळेतील मुख्याध्यापिका सारिका गुजराती, विश्वजीत तांबे, वर्षा वनरकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी सर्व विजयी व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक कीर्तीराज नाचरे व क्रीडा शिक्षिका वृषाली कडू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंकडून उत्तम कामगिरी पार पाडली.

आणखी वाचा