साखरपा, दि. १८ (प्रतिनिधी): आंबा घाट सड्याचा कडा स्पॉटवर दोन मृतदेह काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आले त्यानंतर या ठिकाणी देवरुख व शाहूवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. रात्री उशीर झाल्याने अतिशय घनदाट जंगल व खोल दरीत असल्याने मृतदेह रविवारी सकाळी काढण्यासाठी प्रारंभ झाला .
राजू काकडे हेल्प अकॅडमी देवरुख आणि आंबा हेल्प अकॅडमी, पोलिस विभाग यांच्या संयुक्तपणे ही मोहीम पार पाडण्यात आली. सुमारे 200-300 फूट असणारी दरी,घनदाट जंगल, दाट धुके यामुळे ही मोहीम जिकरीची ठरली.मृतदेह दरीच्या बाहेर काढल्यानंतर हे मृतदेह स्वरूप माने (24) कवठे पिरान सांगली, व सुशांत सातवेकर (19)निपाणी बेळगाव कर्नाटक यांचे असल्याचे समजले.
हे दोघेही कागल येथील जंगली महाराज यांच्या आश्रमातील शिष्य होते. यावेळी स्वरूप याचे भाऊ ओंकार माने यांनी साखरपा पोलीस स्थानकात आपला जबाब दिला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगतिले की, त्यांचा भाऊ शिक्षित असून कागल येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याला धार्मिक वृत्तीची आवड असल्याने तो जंगली बाबांच्या मठात राहत होता.त्यांचा शिष्य बनून तो राहत होता.
मात्र 8 ऑगस्टला त्याने घरी फोन झाला असता, तो व त्याचा मित्र वातावरण बदल म्हणून पावसला जात असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. त्यांनी ओंकार यांच्या नावे असलेली मोटरसायकल MH 10 DJ 2023 ही घेऊन गेले होते.मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. त्यांनी कागल येथील गोरंबे जंगली महाराज आश्रम याठिकाणी ही चौकशी केली.
त्यानंतर माने व सातवेकर यांनी कागल पोलीस स्टेशन येथे हे दोघे बेपत्ता असल्याची खबर दिली. त्यानंतर 17 ऑगस्ट या दिवशी त्यांच्या नावे असलेली मोटरसायकल चांदोली अभयारण्य गेट या ठिकाणी आढळून आली असे शाहूवाडी पोलीस स्थानकाकडून कळविण्यात आले..त्यामुळे आम्ही परिसरात शोधाशोध केली असता दरीच्या दिशेने कुजलेला वास आल्याने पाहीले असता दोन मृतदेह आढळून आले. त्यानंतर वर दोन्ही मृतदेह काढले असता तो स्वरूप माने व सुशांत सातवेकर यांचा असल्याचे पक्के झाले.
त्याचबरोबर आपल्या जबाबात सांगताना म्हणाले की, हे दोघेही जंगली महाराज यांचे शिष्य होते. आजारपणामुळे मागील महिन्यात त्या महाराजांचा मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूमुळे या दोघांना प्रचंड दुःख झाले व मानसिक तणावाखाली होते. त्याचबरोबर त्यांना महाराजांची आठवण येत होती व ते असल्याचा भास होत होता. त्याचबरोबर आश्रमात येणारे भक्त देखील महाराजांची चौकशी करत असल्याने यांना आठवण येत होती.त्यामुळे या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांनी सांगतिले व या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे त्यांच्या जबाबात सांगतिले.ही घटना शाहवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे, मृतदेह देवरुख पोलीस स्थानकाच्या हद्दीत मिळाल्याने देवरुख पोलीस स्थानकामधील साखरपा दूरक्षेत्र येथे नोंद करण्यात आला.
साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले. दोघांचेही नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले होते. या घटनेचा तपास पोलीस सहाय्य्क निरीक्षक संजय पाटील, शबनम मुजावर त्याचबरोबर पोलीस कर्मचारी संदेश जाधव, नितीन जाधव,प्रताप वाकरे,वैभव नटे आदी करत आहेत.








