रत्नागिरी जिल्ह्यात ३ वर्षांत २८ बिबट्यांची मानवी वस्तीत घुसखोरी

रत्नागिरी, दि. १२ (प्रतिनिधी): जंगली प्राण्यांचा अधिवास धोक्यात आल्याने मानवी वस्तीमध्ये या प्राण्यांचा वावर वाढला आहे. बेसूमार वृक्षतोडीमुळे भक्षासाठी हे प्राणी वस्तित शिरत असल्याने या प्राण्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात मानवी वस्तिमध्ये शिरकाव करणाऱ्या प्राणांपैकी बिबट्या हा एक आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये १२ बिबट्यांना जीव गमवावा लागला आहे. तर वन विभागाच्या यशस्वी रेस्क्सूमुळे १६ बिबट्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात यश आले आहे. ३ वर्षांमध्ये २८ बिबट्यांची मानवी वस्तीत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे.
       रत्नागिरी परिक्षेत्र वन विभागाने दिलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. यामध्ये रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर हे तालुके येतात. गेल्या काही वर्षांमध्ये या परिक्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे व्यघ्र गननेमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यात बेसुमार होणारी वृक्षतोड आणि प्राण्यांच्या अधिवासामध्ये माणवाचे होणारे अतिक्रमन यामुळे प्राण्यांची नैसर्गिक अन्न साखळी अडचणीत आली आहे. त्यामुळे वस्तीमध्ये कधी न दिसणाऱ्या बिबट्या दररोज कोणत्या ना कोणत्या भागामध्ये भक्षाच्या शिकारीसाठी आल्याचे वारंवार उघड होत आहे. बिबट्या हा प्राणी जंगलामध्ये आपल्या अधिवास निश्चित करतो. सुमारे दोन ते चार किमीचा त्याने हा जंगलाचा भाग तयार केलेला असतो. त्यामध्ये तो अन्य दुसऱ्या बिबट्याची घुसखोरी करून देत नाही किंवा या अधिवासासाठी बिबट्यांमध्ये जीवघेणी लढाई देखील होते.
       अधिवासच धोक्यात आल्याने गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्या मोठ्या संख्येने मानवी वस्तीमध्ये शिरत आहे. भक्ष म्हणून गावातील कुत्री, शेळ्या, जनावरांवर तो हल्ला करून आपली उपजिवीका भागवत आहे. माणवांवरही बिबट्याने हल्ले केले आहेत. त्यामुळे बिबट्या फासकीत आडकणे, विहिरीत पडणे, घरात शिरणे असे प्रकार घडत आहेत. रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसून काही बिबट्यांचा मृत्यू झाला आहेत काही भुकबळी ठकरे आहेत. रत्नागिरी परिक्षत्र वन विभागाने २०२२ पासून फेब्रुवारी २०२४ या दरम्यान १२ बिबट्यांना वेगवेगळ्या घटनांमध्ये जीव गमवावा लागला आहे. तर १६ बिबट्यांना भक्षाच्या शोधात अडचणीत आले असताना त्यांना रेस्क्यु करून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. तीन वर्षांमध्ये २८ बिबट्ये मानवी वस्तीमध्ये शिरल्याचे उघड झाले आहे.

आणखी वाचा