चिपळूण, दि. १३ : सिद्धांत प्रदीप घाणेकर हा दापोली तालुक्यातील देगाव गावचा सुपुत्र होता अभ्यासात हुशार असलेला उत्तम खेळाडू असलेला सिद्धांत हा गावातील सगळ्यांचाही लाडका विद्यार्थी होता आपल्या भारतीय सैन्यात असलेल्या मोठ्या भाऊ ओंकार याचे लग्न ठरलं होतं. या आनंदात सिद्धांत होता भावाच्या लग्न ठरवण्याच्या कार्यक्रमासाठी तो शनिवारी कॉलेज करून आपल्या गावी येणार होता मात्र निष्ठुर नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तो गेल्या आठवड्यात आपल्या गावी देगाव येथे आला होता तीच त्याची शेवटची ट्रिप ठरली. चिपळूण शहरातील डीबीजे महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स विषयातील तो दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता
सिद्धांत याचे वडील हे भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आहेत तर आई गृहिणी आहे सिद्धांताचा मोठा भाऊ ओंकार हा भारतीय सैन्यात सेवेत आहे तो सध्या रजेवरती आला आहे. सिद्धांत याचा दादा ओंकार याचे लग्न ठरलं होतं याच आनंदात हे सगळं कुटुंब होतं आपल्या दादाच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम हा रविवारी म्हणजेच उद्या 14 जुलै रोजी देगाव येथे घरी होणार होता. ग्रामीण भागातील असलेला सिद्धांत हा परिसरात अत्यंत हुशार व प्रामाणिक विद्यार्थी म्हणून सगळ्यांच्याच लाडका होता. तो गेल्या आठवड्यात घरी आला असताना त्याने शेजारी एका अत्यंत जवळचे संबंध असलेल्या काकांनाही सांगितले होते की काका मी कॉलेज करून रविवारी दादाच्या कार्यक्रमासाठी घरी येतो असे तो सांगून गेलेल्या सिद्धांत याचे ते सांगणं दुर्दैवाने अखेरचा ठरलं. अभ्यासाबरोबरच खेळातही लहानपणापासून सिद्धांत हा हुशार व आवड असलेला विद्यार्थी होता. तो कम्प्युटर सायन्स चा विद्यार्थी होता कॉम्प्युटर इंजिनियर होण्याचे त्याचे मोठ स्वप्न होतं.
आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम त्या साईडला उभी असलेली टपरी सारखी अनधिकृत ठिकाण ही वादाचा विषय ठरत असतानाच या काँक्रीटच्या भिंतीच्या खाली उभी असलेली ही टपरी सिद्धांत साठी मात्र काळ ठरली आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने टपरीच्या आधाराला सिद्धांत थांबला होता असाही प्राथमिक अंदाज आहे. मात्र ही टपरी यावेळी बंद होती अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची भीती होती अशीही माहिती आता समोर आली आहे. या घटनेमुळे चिपळूण शहर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती चिपळूण शहरात महामार्ग लगत असलेल्या डीबीजे कॉलेज साठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सिमेंट काँक्रीटची घालण्यात आलेली संरक्षक भिंत व त्यावरती जांभ्या दगडाची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घातलेली भिंत मुसळधार पावसात कोसळल्याने हा दुर्दैवी अपघात घडला आहे. सिद्धांत याच्या मृत्यूची अत्यंत धक्कादायक अशी बातमी गावात कळताच सगळ्यांना धक्का बसला परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.








