चिपळूण, दि. ०४ (प्रतिनिधी): परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय,चिपळूण येथे दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी दिव्यांच्या वेगवेगळ्या रूपांचे मांडणी करण्यात आली होती.
यामध्ये लामणदिवा, पणती, समई, दीवटी, दीपमाळ, मेणबत्ती, कंदी ल अशा विविध दिव्यांचा समावेश होता.शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.सिध्दी ठसाळे, सौ.प्राची गगनग्रास, सौ.अनुराधा वाचासिध्द, सौ. शर्मिला मोडक यांच्या हस्ते दिव्यांच्या या विविध रूपांचे पूजन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ.ज्योती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दीप अमावस्येविषयी माहिती दिली. शिक्षक श्री. रोहिदास देवरे यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून दिव्यांची माहिती दिली. शाळेत आज शाळेत इयत्ता पहिलीसाठी पणती चित्र रंगवणे, इयत्ता दुसरीसाठी मातीपासून दिवे तयार करणे,इयत्ता तिसरीसाठी नाग तयार करणे आणि इयत्ता चौथीसाठी राखी तयार करणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
अशाप्रकारे आपल्या प्राचीन समृद्ध संस्कृतीतील दिव्यांचे महत्त्व सांगणारा हा सण शाळेत मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला .








