चिपळूण, दि. २८ : माझ्या सामाजिक कामाची दखल घेऊनच भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवत मला प्रभाग क्रमांक ९ मधून उमेदवारी दिली आहे. माझ्या पक्षाचा आणि माझ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा हा विश्वास मी नक्कीच सार्थकी लावीन. माझ्या प्रभागासह शहराचा विकास हा नव्या संकल्पनेतून करण्यासाठी आम्ही सारेच प्रयत्न करणार आहोत. भाजपा म्हणजेच नव्या संकल्पनेचा विधायक कामांचा आणि अत्याधुनिक योजनांचा संगम आहे यातूनच शहर निश्चितच वेगळा दिशेने वाटचाल करेल अशी मला खात्री आहे असे मनोगत भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक नऊच्या उमेदवार सौ. अंजली सतीश कदम यांनी दैनिक सागरशी बोलताना व्यक्त केले
मी गेले २० वर्ष विविध सामाजिक संस्थांवर काम करत आहे. हेल्प फाउंडेशन चिपळूण या संस्थेवर मी सध्या उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहत आहे यादी लायनेस क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी आणि शहरातील काही सामाजिक संस्थांमध्ये मी काम केले आहे. या कामांच्या माध्यमातून मी मुख्यत्वे करून अन्यायग्रस्त आणि अत्याचार ग्रस्त महिलांना नाही देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. यासाठी मी संस्थेच्या माध्यमातून कायदेशीर मदत आणि सहकार्य करत आले आहे. याशिवाय पर्यावरण विषयक उपक्रम आणि कार्यक्रमही मी नेहमीच राबवत आले आहे. शहरांमध्ये महिलांसाठी रोजगार निर्मितीचे छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजन करणे तसेच परिसरातील शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले आहेत. चिपळूण शहराच्या पूर विषयावर माझी नेहमीच अग्रेसर भूमिका राहिली आहे. चिपळूण शहराच्या पूर समस्येवर जेव्हा आंदोलन छेडण्यात आले होते त्यावेळी माझा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होता. तसेच संस्थेच्या माध्यमातून आम्ही जलपरिषदेचेही आयोजन केले होते.महाराष्ट्रात आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टी आणि नव्या संकल्पनेतून अनेक लोकोपयोगी प्रकल्प आणि योजना अंमलात येत आहेत. चिपळूणसारख्या कोकणातील मध्यवर्ती शहरात कोकणचे नेते माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे साहेब, मस्य, बंदरे विकास मंत्री नितेश राणे या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या अनुभवनात आणि मार्गदर्शनातून उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी आमच्या युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेश सपकाळ तसेच माझ्याबरोबर भाजप बरोबरच निवडणूक लढवत असलेले शशिकांत मोदी आम्ही यासाठी निश्चित धोरण ठरवलेले आहे व त्याप्रमाणे आम्ही आखणीही करत आहोत.मी ज्या प्रभागातून उमेदवारी लढवत आहे त्या प्रभाग क्रमांक ९ हा मुंबई गोवा हायवे लागत असून दोन रस्त्यांच्या मधोमध हा प्रभाग आहे तसेच राधाकृष्ण नगरचा आणि काही रावतळे चा भागही यामध्ये समाविष्ट होत आहे.
या प्रभागाचे तीन भाग असून त्यातील नागरी समस्या या वेगवेगळ्या आहेत. या अंतर्गत भागातील मुख्यत्वे समस्या आहे ड्रेनेज सिस्टम ची आहे तसेच हायवे लगत असलेले ड्रेनेज व्यवस्था ही व्यवस्थित करणे हाही महत्त्वाचा विषय आहे.आमच्या प्रभागामध्ये अंतर्गत जोड रस्ते आहेत. हे जोड रस्ते दोन्ही महामार्गांना जोडले जातात परंतु या रस्त्यांचे डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण करणे ही महत्त्वाचे आहे तोही विषय आम्ही पूर्ण करणार आहोत. प्रभागामध्ये वाचनालय, लहान मुलांच्या खेळाच्या मैदानाचा विकास त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये मी सतत कार्यरत असल्यामुळे माझा नागरिकांशी सातत्याने संपर्क येतच असतो. नगरसेवक पदाची जबाबदारी आल्यानंतर मी स्वतःहूनच अधिक संपर्क वाढवणार आहे आणि याकरिता महिन्यातून किमान प्रभागातील प्रत्येक भागामध्ये घरगुती बैठका घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय अतुल काळसेकर, जिल्हा प्रभारी निरंजन डावखरे, भाजपा नेते विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चिपळूण शहर निवडणूक प्रभारी प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे,भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, सचीव प्रणाली सावर्डेकर, शहर प्रमुख शशिकांत मोदी ज्येष्ठ माजी नगरसेवक विजय चितळे या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे व त्यांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने मी ही निवडणूक निश्चितच जिंकेन अशी मला खात्री आणि विश्वास आहे.








