लाडक्या बहिणीसाठी महामेळावा, मात्र बहिणींची गैरसोय

oplus_1048576
oplus_1048576
oplus_1048576
oplus_1048592

रत्नागिरी, दि. २१ (प्रतिनिधी): आज मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील चंपक मैदान येथे महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे वारे जोरात सुरू झालेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी येथे आले होते.

या मेळाव्यासाठी प्रत्येक तालुक्यातील शासकीय अधिकारी महिला वर्ग, जि. प. आणि पंचायत समित्यांच्या पदाधिकारी यांना बहिणींना गावागावांतून गोळा करून आणण्याचे आदेश दिले गेले. मात्र सकाळ पासून घरातून निघालेल्या या बहिणी कार्यक्रम संपला तरी उपाशी बसल्या होत्या. बाहेर जावू शकत नव्हत्या. कारण?

या बहिणींना आणण्यासाठी खास एस.टी. बस बुक केल्या होत्या त्या गावागावातून सोडण्यात आल्या होत्या साधारण प्रत्येक अधिकाऱ्याने सुमारे बहिणींना कार्यक्रमस्थळी आणावे यावर जोर दिला होता. मात्र प्रत्यक्षात फारच कमी बहिणीं कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. मांडवात अनेक जणी जमिनीवरच स्थानापन्न झाल्या.

बहिणींना घरी जाण्यासाठी त्याच एस.टी. परत जाणार होत्या. त्यासाठी महामंडळाच्या सगळ्या आगारातून बस मागविण्यात आल्या होत्या. याचा परिणाम स्वरूप इतर प्रवाश्यांची आज प्रचंड गैरसोय झाली.

आज संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंत घरी परतण्यासाठी एस.टी. नसल्याने कित्येक प्रवाश्यांना मानसिक आणि शारिरिक त्रास सहन करावा लागला. काही एस.टी. अचानक रद्द होत असल्याचे सांगण्यात येत होते. रहाटाघर येथील एस.टी. कर्मचारी यावर उत्तर देण्यास सक्षम नव्हते. यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या असून अनेकांच्या तोंडी मुख्यमंत्र्यांनी सगळ्याची वाट लावली असे उद्‌गार निघत होते. एस.टी च्या या त्रासामुळे शालेय मुलांना आणि, रूग्णांना फार मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

तर हातखंबा ते चंपक मैदान येथे एस.टी.च्या गाड्यांची लांबच लांब रांग दिसत होती. त्यामुळे इतर वाहनांसाठी जागा न मिळाल्याने ट्रॅफिक जाम झाले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सगळ्याच एस.टी भरून आल्या नव्हत्या. तर काही एस.टी. मध्ये अवघ्या तीन ते चारच महिला असल्याचे दिसून आले होते.

 

दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात साऊंड सिस्टीम मध्ये बिघाड झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी अडथळा निर्माण होत होता. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, हि साऊंड सिस्टीम महाविकास आघाडी ची आहे कि काय….. असा टोला विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी लगावला.

आणखी वाचा