तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीच्या संघानी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दापोली, दि. १८ (प्रतिनिधी): सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी यांच्या संघाने तालुका स्तरावरील अंडर 14 फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विजय संपादन केला आहे.
तीन संघांना पराभूत करत त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. या विजयासह शाळेने आपल्या तालुक्याचा सन्मान वाढवला आहे. या यशामुळे आता शाळेचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेणार आहे.

विशेष म्हणजे, या स्पर्धेत *सर्वेश शिंदे* याला *सर्वोच्च गोल स्कोरर* म्हणून गौरविण्यात आले आहे, तर रोनक सुंदेशा याला सर्वोत्तम गोलरक्षक (बेस्ट गोलकीपर) म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. या दोघांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेच्या संघाला या यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे.

शाळेच्या संघातील खेळाडूंच्या कौशल्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे, आणि शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक, आणि मित्रमंडळींनी या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करत त्यांना आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संस्था अध्यक्ष श्री सुजय मेहता व मुख्याध्यापिका सौ रितू मेहता यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा