दापोली, दि. २५ : काल दिनांक २४/०७/२०२४ रोजी वनोशी तर्फे नातू ( गाववाडी ) गावामध्ये जास्त पाऊस असल्यामुळे झाड तुटून हनुमान मंदिराच्या साहित्य ठेवण्यासाठी बांधलेली खोली वरती झाड पडून नुकसान झाले.
मंगेश देवघरकर रा. साखळोली यांचे घरावर झाड पडून नुकसान झाले. माटवण येथील शिवाजी नारायण महाडिक यांच्या गोठ्याची पावसामुळे भिंत पडली आहे पंचनामा केला आहे. विठ्ठल जयराम जाधव रा.उर्फी यांचे घराचे पत्रे व कौलांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. मौजे गावतळे येथील हायस्कुलच्या शौचालय इमारती वरती झाड कोसळले.
इमारती चे नुकसान होऊन कोणतीही जीवित हानी नाही. किनारपट्टीलगत ठिकाणी काही नुकसान आहे. ब्राम्हवाडी जालगांव येथील रस्त्यावरील झाड बाजूला करण्यात आलेले आहे वाहतूक सुरळीत चालू झालेली आहे.
काल दि. २४ जुलै २०२४ रोजी,

मौजे सतेरे तर्फे हवेली येथे महादेव बाळू बेंडल यांच्या घराचे अतिवृष्टी/वारा या मुळे नुकसान झाले आहे, जीवितहानी नाही. माटवण येथील शिवाजी नारायण महाडिक यांच्या गोठ्याची पावसामुळे भिंत पडली आहे. मौजे शिरखल येथे रामचंद्र वसंत शिंदे यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे.








