देवरुख, दि. ०२ : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या समन्वय्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरीचे सामाजिक योगदान स्पष्ट केले. या कार्यक्रमाची सुरुवात ‘ही मायभूमी ही, जन्मभूमी ही, कर्मभूमी ही अमुची’ या गीताने करण्यात आली. त्यानंतर सादर केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली. सई नर, वैष्णवी झगडे, आर्या बेर्डे, नेहा गवाणकर, पायल पवार, आश्लेषा इंदुलकर, अन्वी प्रसादे, प्राजक्ता तावडे या विद्यार्थिनी श्रवणीय पोवाड्याचे सादरीकरण केले. पोवाडा व गाण्यांसाठी गोरक्ष जागुष्ट्ये, अथर्व कदम, चिराग पवार या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ढोलकी, तबला व हार्मोनियमच्याद्वारे संगीत साथ दिली.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे’ आणि ‘लोककलांचे संवर्धन होण्याची गरज आहे का?’ या दोन विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे —
प्रथम क्रमांक- कु. स्नेहा नितीन शेट्ये(१२वी वाणिज्य).
द्वितीय क्रमांक- कु. वैभवी बबन चव्हाण(१२वी संयुक्त-वाणिज्य).
तृतीय क्रमांक- कु. वैष्णवी विजय झगडे(११वी, वाणिज्य).
उत्तेजनार्थ – कु सुकन्या शंकर बागवे (११वी वाणिज्य)
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रा. संदीप मुळ्ये यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सीमा कोरे, प्रा.अभिनय पातेरे, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. मयुरेश राणे, प्रा. देवयानी जोशी आणि प्रा. स्वप्नाली झेपले यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी, तर आभार प्रा. संदीप मुळ्ये यांनी मानले.








